वनराई चे एकूण नियोजित क्षेत्र - २३० एकर

वनराई प्रकल्पाचे आम्ही अत्यंत काळजीपूर्वक आणि शास्त्रोक्त नियोजन केलेले आहे कारण शेतीविकास व निसर्ग संवर्धन हे एका रात्रीत घडून न येणाऱ्या गोष्टी आहेत आणि म्हणूनच आम्ही संपूर्ण वनराई प्रकल्पाचा स्वतः शेतकरी व तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली एक सुनियोजित असा आराखडा बनविला आहे जो निश्चितच तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीबद्दल खात्री देईल.

फेज - I - ४५ एकर क्षेत्राचा विस्तार - २ वर्षे

सुरुवातीची २ वर्षे आम्ही फक्त लागवडीयोग्य सुपीक जमीन बनविण्यासाठी देणार आहोत ज्याद्वारे जमिनीचा अभ्यास, कस, माती प्रकार, पाणी शोषून धरण्याची क्षमता इ. ची इथ्यंभूत माहिती आपल्याला प्राप्त होईल जी पुढील शेती विकसनासाठी व निसर्ग संवर्धनासाठी मोलाची भूमिका बजावेल.

यानंतर शेतीची व निसर्ग संवर्धनाची आमच्या सभासदांनाही आवड निर्माण व्हावी व त्या ओढीने त्यांनी प्रकल्पाला नियमित भेट द्यावी म्हणून त्यांच्या सोयीसाठी राहण्यायोग्य असे शेतघर व गोठ्यांची निर्मिती केली जाईल.

शेतीच्या आवश्यकतेनुसार पाणी, वीज-पुरवठा, रस्ते या मूलभूत गरजांची पूर्तता केली जाईल.

यानंतर सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असणारी खते आपल्याच शेतात निर्माण करता यावीत म्हणून गो-पालन व शेळीपालन याची सुरवात केली जाईल.

यापुढील टप्प्यात फळझाडांची व आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड सुरु केली जाईल.

सभासद स्वतः शेती करण्यास असमर्थ असतील तर त्यांच्या जमिनीचे नियमित संगोपन आमच्याद्वारे केले जाईल.

यानंतर शेतीयोग्य बनविलेल्या जमिनीमध्ये हवामानानुसार उत्तम वाढ होईल अश्या विविध पिकांची लागवड करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार त्या पिकांच्या वाढीचा, हवामानाचा व भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांची माहिती पुढील शेती विकासासाठी उपलब्ध करून देण्यात येईल ज्याद्वारे आपल्याला शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबविणे व ते यशस्वी करणे सोपे जाईल.

फेज - II - ४३ एकर क्षेत्राचा विस्तार - ६ महिने

आता या टप्प्यामध्ये मागील २ वर्षात केलेल्या शेती अभ्यासाच्या आधारे सभासदांच्या मागणीनुसार विविध पिकांची लागवड करून खात्रीशीर उत्पन्न मिळविण्यास सुरुवात केली जाईल.

शेती मालाची ने-आण करण्यासाठी अंतर्गत पक्के रस्ते, वीज जोडणी व पाण्याची आवश्यकतेनुसार पूर्तता केली जाईल.

तुमच्या प्लॉटवरील शेती लागवडी बरोबरच आता कायमस्वरूपी राहण्यायोग्य शेतघर उभारण्याचे नियोजन व प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली जाईल.

फेज - III - ५० एकर क्षेत्राचा विस्तार - कायमस्वरूपी शेती व निसर्ग संवर्धन

ह्या टप्प्यात वाढ झालेल्या पिकांच्या व निसर्गाच्या कायमस्वरूपी संवर्धनासाठी योग्य ते नियोजन केले जाईल. आता वनराई प्रकल्पामध्ये विकसित केलेली सेंद्रिय शेती, फळझाडे, आयुर्वेदिक वनस्पती इ.चा सर्व सभासदांना मोफत लाभ घेता येईल त्याचबरोबर सभासदांव्यतिरिक्त निसर्ग संवर्धनाची आवड असणाऱ्या निसर्ग प्रेमींसाठी व त्यांच्या अभ्यासासाठी नाममात्र शुल्क आकारून वनराईमधील परिपूर्ण निसर्ग अनुभवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल.

या टप्प्यातील विकास हा असा होईल:

१० एकर सेंद्रिय शेती
१० एकर फळझाडे लागवड
१० एकर आयुर्वेदिक वनस्पती लागवड
१० एकर व्यावसायिक शेती
१० एकर ऍग्रो टुरिझम

फेज - IV - 3० एकर क्षेत्राचा विस्तार - निसर्ग संवर्धन व वृक्ष लागवड

या टप्य्यात वनराई मध्ये विविध ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या व शेती उपयोगात न येऊ शकणाऱ्या डोंगर, टेकड्या, ओढे ह्या भागांमध्ये नैसर्गिकरित्या वाढलेल्या झाडे, झुडुपे इ. ची निगा राखली जाईल आणि यासोबतच जिथे जिथे शक्य असेल तिथे जास्तीत जास्त प्रमाणात भारतीय वृक्षांची लागवड व त्यांचे संगोपन केले जाईल.

फेज - V - ३० एकर - 'वनराई ऍग्रो' ची शेती

आम्ही स्वतः नियमित शेती करतो व त्याचबरोबर विविध मार्गांनी निसर्गसंवर्धनची आमची आवड ही जोपासतो. ह्या प्रकल्पाद्वारे आम्ही स्वतः ३० एकर मध्ये सेंद्रिय शेती, फळझाडे लागवड, शेतीपूरक व्यवसाय, व्यावसायिक शेती इ. आमच्या संकल्पना स्वतः राबविणार आहोत आणि तेही पूर्णवेळ तिथेच राहून कारण आमच्या शेतीसोबतच तुमच्या शेतीची सुद्धा जबाबदारी आमची आहे असे आम्ही मानतो.

कसे वाटले आमचे नियोजन ?? जबरदस्त ना ?? मग वाट कसली पाहताय... आम्ही देत असलेल्या आकर्षक ऑफर्स चा आजच लाभ घ्या... अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा किंवा प्रत्यक्ष आम्हाला भेटून तुमच्या गुंतवणुकीची खात्री करून घ्या.