फळबाग लागवड - खात्रीशीर उत्पन्न

सेंद्रिय शेतीच्या बरोबरीने फळबाग शेती आजच्या काळात खूप फायद्याची ठरत आहे कारण देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही बारमाही मिळत असेलेला चांगला भाव व विविध शासकीय योजनांचे पाठबळ, आणि ह्यामुळेच फळबाग लागवडीला चालना दिली पाहिजे. शेतीतून हमखास उत्पन्न मिळविण्यासाठी फळझाडांची सुद्धा सेंद्रिय शेतीच्या योग्य प्रमाणात लागवड करून त्यांची निगा राखणे हे वनराईच्या संकल्पनेमागचे एक मुख्य उद्दिष्ट आहे. यातून अन्नप्रक्रिया उद्योगाला मोठी चालना मिळेल व जवळील कुटुंबाना उदरनिर्वाहासाठी आणखी एक काम मिळेल. वनराईतील तुमचा प्लॉट हा आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, फणस, नारळ, अंजीर इ. फळझाडांनी नक्कीच नटलेला असेल आणि यातून तुम्हाला अतिरिक्त उत्त्पन्न ही मिळेल.

फळबाग लागवडीसाठी तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन का आवश्यक आहे ?

तुमच्याकडे असलेल्या जागेत दोन चार फळांच्या बीया लावल्या आणि त्याला पाणी टाकले म्हणजे फळबाग तयार झाली झाले एवढे सोपे हे नक्कीच नाही. फळबाग लागवड हे थोडी जास्त गुंतवणुकीची आणि दीर्घ मुदतीची प्रक्रिया असल्यामुळे तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन गरजेचे ठरते. आम्ही तुमच्या फळबाग फुलविण्यासाठी जमिनीची निवड, मातीची तपासणी, फळपिकाची निवड, लागवडीचा आराखडा, जातिवंत कलमे, रोपांची निवड, पाण्याची उपलब्धता, बाजारपेठ या गोष्टींचा योग्य अभ्यास केलेला आहे आणि याच्या आधारेच आम्ही तुमच्या प्लॉटवर निश्चितच विविधतेने नटलेली फळबाग फुलवू.

वनराईतील फळझाडांचे व्यवस्थापन

पाण्याचे अत्यंत काटेकोर व्यवस्थापन हा नवीन फळझाडांच्या लागवडीतील एक प्रमुख मुद्दा आहे आणि म्हणूनच आम्ही पाणी व्यवस्थापनाच्या विविध क्लुप्त्या वापरून फळझाडांची योग्य निगा राखू. या साठी आमच्या बरोबर तज्ज्ञ मार्गदर्शक, अनुभवी शेतकरीवर्ग व स्थानिक मजूर वर्ग असेल.
आमच्या शेतीविकासातील दांडग्या अनुभवानुसार आम्ही फळझाडांच्या वाढीसाठी विविध योजना आमलात आणू जसे की तीव्र उन्हापासून काळजी घेण्यासाठी वेळोवेळी पाणी देण्यासाठी योग्य पद्धतींचा वापर करणे, बाष्परोधकांचा वापर करणे, नवीन फळझाडांना सावली देण्यासाठी आच्छादनांचा वापर करणे इ.

फळबाग लागवडीचे फायदे

फळांपासून तयार होणाऱ्या टिकाऊ पदार्थांची आणि ताज्या फळांची बाहेरच्या देशातून मागणी वाढत आहे आणि तसेच विविध देशांमध्ये उपलब्ध नसणारी हंगामी फळांची मागणीही वाढत आहे.
योग्य बाजारभाव मिळत असल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान वापरून नैसर्गिक शेती करण्यास लागणारे भांडवल स्वतः शेतकऱ्यांकडे उपलब्ध होत असल्याने कर्जबाजारीपणा कमी होतो.
फळबाग शेतीसाठी राबवित असलेल्या अनेक शासकीय योजनांमुळे पूर, वादळ, बेमोसमी पाऊस, धुके, गारपीट या नैसर्गिक आपत्तींमध्ये नुकसान झाल्यास भरपाईची हमी आहे.
निर्यातीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्याने परकीय चलन वाढीस वाव मिळत असून ह्याचा एकूणच परिणाम शेतीशी नियंत्रित अर्थव्यवस्थेवर होत आहे.
फळझाडांची लागवड केल्याने जमिनीची धूप होत नाही तसेच यामुळे आजूबाजूचा परिसर हिरवागार व प्रदूषण विरहित राखण्यात मोलाची मदत होते.
फळझाडे जिथे असतात तिथे विविध पक्षी आपली घरटी उभारतात व त्यांचीही संख्या वाढते आणि यामुळे निसर्गसंवर्धनाचा समतोलही राखला जातो.
फळझाडांच्या वाढीचा परिणाम हा पर्जन्यमानावर ही होतो कारण यामुळे पावसाचे प्रमाण वाढते.