मसाले वनस्पती - दर्जेदार पिकवा, दर्जेदार खा

अद्वितीय सुगंध असणारे भारतीय मसाले अजूनही जागतिक बाजार पेठेत वर्चस्व राखून आहेत तसेच त्यांचे जेवणातील व निसर्गचक्रातील महत्वही अनन्यसाधारण आहे. जैवविविधता जपण्याबरोबरच उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करणे हे वनराई चे एक प्रमुख ध्येय आहे. या मसाल्यांच्या वनस्पती लागवडीत ओवा, हिंग, दालचिनी, मोहरी, जायफळ, हळद यांसारख्या अनेक उपयोगी वनस्पतींची निगा राखली जाईल.

मसाला शेती - मिश्र शेतीचा उत्तम पर्याय

अनेक वर्षांपासून भारताचे मसाले उत्पादनातील अग्रस्थान अजूनही टिकून आहे कारण मसाल्यांच्या शेतीसाठी अनुकूल वातावरण, मसाले उत्पादन खरेदी करण्यासाठी असलेला मोठा व्यापारी वर्ग, विविध शासकीय योजनांचे पाठबळ अश्या कारणांमुळे शेतकरी वर्गाला मसाला पिकांची शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. भारताचा दक्षिण भाग आणि महाराष्ट्रातील अनेक पट्टे हे प्रामुख्याने मसाला उत्पादनात मोठा वाटा उचलतात. जमिनीची पोषकता आणि मसाला शेतीसाठी लागणारे योग्य असे भौगोलिक वातावरण येथील मसाले दर्जेदार बनवितात. वनराई मध्ये आपण प्रामुख्याने काळी मिरी, वेलची, जायफळ, दालचिनी, दगड फुल, धणे इत्यादीं मसाला पिकांची लागवड करणार आहोत. मुख्यत्वे मसाला पिकांची शेती ही नारळ बागेसोबत मिश्र शेती म्हणून केली जाते. मसाल्यांना संपूर्ण भारतात व आंतराष्ट्रीय बाजारपेठेत असलेली बारमाही मागणी तुम्हाला अजून एक अतिरिक्त व नियमित उत्पन्नाची खात्री देते.

वनराईतील मसाले पिकांची निगा योजना

आमचे मूळ उद्दीष्ट हे निसर्गसंवर्धन व जैवविविधता जोपासणे हे आहे आणि म्हणूनच दर्जेदार मसाला पिकांची वाढ व्हावी यासाठी आम्ही खालील पद्धती अवलंबित आहोत.

नव्याने लागवड केलेल्या मसाला पिकांखाली फुटवा / तण लगेच जोर धरू लागते म्हणूनच नियमितपणे त्या फुटवा / तणांची छाटणी करणे.
अतिउन्हामुळे मसाला पिके करपू शकतात म्हणून सावलीसाठी त्यांच्यावर आच्छादने उभारणे.
नवीन कलमांना आधार न दिल्यास ती वेडीवाकडी वाढू शकतात म्हणूनच त्यांना काठ्यांचा किंवा केळीच्या खुंटांचा आधार देणे.
कलमांची योग्य वाढ होण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा करणे.
पिकांच्या बुंध्याजवळ आच्छादने करून माती वाहून न जाण्यासाठी उपाय योजणे.
कोणतीही कीड अथवा रोग यांची मसाला पिकांना लागण होऊ नये म्हणून नियमितपणे सेंद्रिय मिश्रणांचा फवारा मारणे.