आर्थिक उत्पन्नासाठी व्यावसायिक शेती

निसर्गसंवर्धन करणे हा तर आमचा मूळ हेतू आहेच परंतु तुम्ही प्लॉट खरेदी करण्यासाठी करत असलेल्या गुंतवणुकीवर आजीवन नियमित उत्पन्न मिळवून देणे हे सुद्धा आम्ही आमचे कर्तव्य समजतो आणि म्हणूनच तुमच्या प्लॉट वरील काही भाग हा आम्ही व्यावसायिक शेतीसाठी वापरात आणणार आहोत. या द्वारे तुम्ही स्वतः तुमच्या शेतीतून मिळवायच्या विविध उत्पादनांच्या संकल्पनांना वाव देऊ शकता किंवा आम्ही स्वतः येथे व्यावसायिक पिके घेऊन मिळणारा नफा हा आपल्यात वाटून घेऊ शकतो. यातून तुम्हाला तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर परतावा मिळत राहील आणि आम्हाला निसर्गवाढीचे समाधान मिळत राहील.

बांबू लागवड

नगदी पिकांना पर्याय म्हणून बांबू लागवड फायद्याची ठरते. महाराष्ट्रातील पश्चिम भागातील हवामान व जमिनीचा प्रकार हा बांबू लागवडीसाठी उपयुक्त आहे आणि यामुळेच येथे बांबूचे व्यावसायिक उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊन नियमित उत्पन्न मिळविता येऊ शकते. बांबूचा उपयोग हा हस्तकला, फर्निचर, बांधकाम, विविध वस्तू, वाद्यनिर्मिती, कागद उद्योग यांच्यासाठी केला जातो.

बांबू लागवडीचे फायदे:

इतर पिकांच्या तुलनेत बांबूसाठी अत्यंत कमी खतपाणी लागते आणि तसेच यांची निगाही राखावी लागत नाही.
जमिनीची धूप रोखण्यास बांबू मोलाची भूमिका बजावतात.
बांबू ही जलद गतीने वाढणारी, हवामान बदलाला अनुरूप, रोग व किडीला बळी न पडणारी वनस्पती आहे.
जैवभार निर्माण करण्यात बांबू महत्वाचे कार्य करतात कारण इतर वनस्पतींच्या तुलनेत बांबू ही वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे चारपट जास्त प्रमाणात शोषण करते.
बांबू हा नाशवंत किंवा खराब होणाऱ्या मालात मोडत नसल्यामुळे त्याची तोडणी कधीही करता येते.
बांबूच्या वनस्पतींची किंवा पिकाची पुनर्लागवड करावी लागत नाही, एकदाच लागवड करून अनेक वर्ष त्यांचे उत्पादन घेता येते.

साग लागवड

घरांच्या बांधकामापासून ते घरातील लाकडी सामानापर्यंत अनेक बाबींमध्ये सागाच्या लाकडाचा वापर होतो कारण सागाच्या लाकडामध्ये असलेल्या विशेष गुणधर्मांमुळे ते अत्यंत मौल्यवान आहे. सागाच्या लाकडाला बारमाही असणारी मागणी पाहता त्याची व्यावसायिक शेती निश्चितच फायद्याची ठरू शकते. साग तयार झाल्यावर एकदा का त्याची तोडणी केली की जुन्या खोडाला पुन्हा धुमारे येतात म्हणजेच एकदा लागवड करून वर्षानुवर्षे उत्पन्न मिळत राहते.