आयुर्वेदिक वनस्पती - आजीबाईचा बटवा

कितीतरी रोगांवर इलाज म्हणून वापर होणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींची भारताने संपूर्ण जगाला देण दिली आहे आणि आता आपण स्वतःच काळाच्या ओघात ह्या वनस्पतींना विसरलो आहोत. वनराई मध्ये अश्या आयुर्वेदिक वनस्पतींची कमतरता नसेल कारण प्रत्येक प्लॉटवर आपण ह्या वनस्पतींच्या लागवडीसाठी जागा राखून ठेवणार आहोत आणि त्यांचे योग्य संगोपन ही करणार आहोत. ह्या मध्ये आपण प्रामुख्याने कडुनिंब, तुळस, कोरफड, अडुळसा, कुडा, बेल, शतावरी, सोनचाफा इ. ची लागवड करणार आहोत.

आयुर्वेदिक व औषधी वनस्पतींची लागवड का महत्वाची आहे ?

पारंपारिक औषधांची प्रणाली ही बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. लोकसंख्यावाढ व त्यामानाने होणाऱ्या औषधांचा अपुरा पुरवठा, उपचारांचा निषिद्ध खर्च, अनेक कृत्रिम औषधांचा दुष्परिणाम आणि संसर्गजन्य रोगांसाठी सध्या वापरल्या जाणाऱ्या औषधांचा प्रतिकार करण्याची क्षमता यांचा विचार करता आयुर्वेदिक व औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात व व्यावसायिक लागवड ही फायद्याची ठरू शकते. WHO च्या अनुसार जगात २१००० हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती ह्या औषधी वनस्पती म्हणून वापरल्या जाऊ शकतात आणि त्यातील ८००० हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती ह्या भारतात आढळून येतात. तसेच औषधी वनस्पतींचे उपचार हे अधिक सुरक्षित मानले जातात कारण ते निसर्गाशी सुसंगत असून त्यांचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. सर्व वयोगटातील अनेक छोट्या व मोठया आजारांवर म्हणून तर आपल्या आजीबाईच्या बटव्यात अनेक आयुर्वेदिक वनस्पतींचे इलाज लिहले आहेत.

आयुर्वेदिक व औषधी वनस्पतींचे फायदे

प्रगत तंत्रज्ञानाचा रोजच्या जीवनात होत असलेल्या अतिवापरामुळे आपण निसर्गापासून दूर जात आहोत. परंतु आपण निसर्गापासून सुटू शकत नाही कारण आपण निसर्गाचाच भाग आहोत. आयुर्वेदिक व औषधी वनस्पतींचे अनेक फायदे खालीलप्रमाणे आहेत:

आयुर्वेदिक वनस्पतींपासून उत्पादित होणाऱ्या गोष्टी ह्या पूर्णपणे नैर्सगिक असल्याने त्या दुष्परिणामांपासून मुक्त आहेत.
अनेक आयुर्वेदिक व औषधी वनस्पती ह्या पर्यावरणास अनुकूल असून अत्यंत सहजरीत्या स्थानिक पातळीवर सुद्धा उपलब्ध होतात.
वेगवेगळ्या हंगामाशी संबंधित आजारांसाठी सहजपणे उपलब्ध होणाऱ्या औषधी वनस्पती पासून तयार होणारे काढे वापरले जातात.
औषधी वापरांशिवाय आयुर्वेदिक वनस्पती ह्या नैसर्गिक रंग, कीटक नियंत्रण, अन्न, सुगंधित अत्तरे, चहा इ. मध्ये सुद्धा वापरल्या जातात.
अनेकदा यांचा वापर हा मुंग्या, कीटक, उंदीर, यांना घरापासून दूर ठेवण्यासाठीही केला जातो.
अतिसार, बद्धकोष्ठता, उच्च रक्तदाब, मूळव्याध, दमा, ताप, सर्दी व पडसे, डांग्या खोकला यांसारख्या आजारांच्या उपचारांसाठी अनेकदा आयुर्वेदिक व औषधी वनस्पतींचाच वापर केला जातो.